रत्नागिरी

सावर्डे पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

रत्नागिरी दि. १५ :- रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीला आळा घालणेकामी व गुन्ह्यांना प्रतिबंध करणेकामी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेश व सूचना दिलेल्या होत्या.

या अनुषंगाने तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण श्री. प्रकाश बेले यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सावर्डे पोलीस ठाणे हद्दीतील खालील नमूद सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 56 (1) (ब) अन्वये 01 वर्षाकरीता रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करुणेबाबत मा. उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांचे न्यायालयात सावर्डे पोलीस ठाण्याकडून हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता.

या प्रस्तावावर सुनावणी होऊन मा. उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चिपळूण, श्री. आकाश लिगाडे यांनी सुमित अविनाश झिंगे, वय 28 वर्षे, रा. निवळी कोष्टेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, यासीन महामुद काद्री, वय 60 वर्षे, रा. सावर्डे, अडरेकर मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी या सराईत आरोपी गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 56 (1) (ब) अन्वये एक वर्षाकरीता रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार आदेश पारित करण्यात आलेला आहे.

यातील सुमित अविनाश झिंगे याच्यावर हातभट्टी तयार करून त्याद्वारे गावठी दारू बनविणे व विकणे यासारखे एकुण ७ गुन्हे दाखल आहेत तर यासीन महामुद काद्री याचावर साथीदारांसह अंमली पदार्थ सेवन करणे व अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या ताब्यात बाळगणे यासारखे एकूण ३ गुन्हे दाखल आहेत.

सदर प्रस्ताव पाठवविणे कामी सावर्डे पोलीस प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. आबासो पाटील व पोकॉ/319 रमेश जड्यार, पोहेकॉ/955 मिनाद कांबळे व म. पोहेकॉ/455 निता गमरे या पोलीस अंमलदार यांनी कामगिरी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button