महाराष्ट्र

आता रविवारी दि. १६ या दिवशीही नामनिर्देशन पत्र उमेदवारांना सादर करता येणार

संगणक प्रणालीद्वारे स्विकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रामध्ये अडचणी येत असल्याने आयोगाने घेतला निर्णय

मुंबई दि. १५ :- राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक २०२५ -नामनिर्देशन पत्र दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपारिक (offline) पध्दतीने सुध्दा स्वीकारण्यात येत आहेत. मात्र संगणक प्रणालीद्वारे स्विकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रामध्ये अडचणी येत असल्याने उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोगाने आता दि.१५/११/२०२५ ते दि. १७/११/२०२५ या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि.१६/११/२०२५ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) नामनिर्देशन पत्र घेण्यात येणार असून, तसे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम दि.४/११/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत आहेत.

परंतू या संगणक प्रणालीद्वारे स्विकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहीले आहेत. अशा परिस्थितीत संगणकप्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोग खालील प्रमाणे निर्देश देत आहेत;

“दि.१५/११/२०२५ ते दि. १७/११/२०२५ या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि.१६/११/२०२५ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजे पर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपारिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील”. तसे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button