महाराष्ट्र

आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची विशेष पूजा ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न

मुंबई दि. २५ जुलै :- यावर्षी आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर मधील प्रती पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानतर्फे आयोजित महाभिषेक व विशेष पूजेचा मान शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांना मिळाला.

त्यासमयी ना. उदय सामंत यांनी मध्यरात्री १२ वाजता महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठूमाऊलीची पूजाअर्चा अत्यंत भक्तीभावाने करत, विठुरायाच्या चरणी महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी, शांती लाभो. राज्यातील शेतकरी सुखी राहो व कष्टकऱ्यांच्या हाताला कायम काम मिळो यासाठी प्रार्थना केली.

या पवित्र सोहळ्याप्रसंगी खासदार श्री. संदिपान भुमरे आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री. राजेंद्रजी पवार यांच्यासह इतर मान्यवर व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button