कृषीरत्नागिरी

लांजातील शेतकरी संशोधक उदय खेर यांचे ओला काजू सोलण्याचे मशीन चर्चेत

लांजा दि. ४ : तालुक्यातील कोट गावचे शेतकरी उदय खेर यांनी विकसित केलेले ओला काजू अखंड सोलण्यासाठीचे मशीन सध्या कोकणात चर्चेचा विषय ठरत आहे.

अलीकडे सोशल मीडियावर या मशीनबाबत मोठ्या प्रमाणात माहिती प्रसारित होत असून, शेतकरी व काजू प्रक्रिया व्यावसायिकांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

या मशीनचा शोध उदय खेर यांनी २०१९ साली लावला. औपचारिक अभियांत्रिकी शिक्षण नसतानाही, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांनी विविध प्रयोगांतून हे यंत्र विकसित केले. मात्र आर्थिक मर्यादा व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे उत्पादन व बाजारपेठेपर्यंत पोहोचणे त्यांना शक्य झाले नव्हते.

हे मशीन काजू उत्पादक व प्रक्रिया उद्योगासाठी वेळ, श्रम व नुकसान कमी करणारे ठरण्याची शक्यता असून, भविष्यात अशा स्थानिक नवकल्पनांना अधिक पाठबळ मिळावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

लांजा तालुक्याचे नाव तांत्रिक नवकल्पनांमुळे राज्यपातळीवर पोहोचवणाऱ्या या प्रयत्नांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button