महाराष्ट्र

भाजपच्या स्टार प्रचारकांत खासदार नारायण राणेंना जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार मोर्चा सज्ज

मुंबई दि. १२ :- महाराष्ट्र होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी चाळीस नेत्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात पहिला टॉप टेनमध्ये माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते विनोद तावडे, श्री. शिव प्रकाश जी, श्री. अशोक चव्हाण, श्री. पीयूष गोयल, श्री. सुधीर मुनगंटीवार अशा नेत्यांचा समावेश आहे.

या शिवाय, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील,रावसाहेब दानवे पाटील, ॲड. आशिष शेलार, श्री. राधाकृष्ण विखे पाटील, श्री. मुरलीधर मोहोळ, सौ. पंकजा मुंडे, श्री. गिरीश महाजन, श्री. गणेश नाईक, श्री. जयकुमार रावल, छ. शिवेंद्रराजे भोसले, श्री. नितेश राणे, श्री. जयकुमार गोरे, सौ. मेघना बोर्डीकर, श्री. अमर साबळे, श्री. अतुल सावे, श्री. अशोक उईके, सौ.चित्रा वाघ, सौ. रक्षाखडसे, श्री. प्रवीण डेरेकर, डॉ. भागवत कराड, श्री. गोपीचंद पडळकर, डॉ. संजय कुटे, श्री. अमित साटम, श्री. धनंजय महाडिक, ॲड. माधवी नाईक, श्री. रंधीर सावरकर, श्री. अशोक नेते, श्री. मंगेश चव्हाण, श्री. प्रसाद लाड, श्री. इद्रिस मुल्तानी अशा एकूण चाळीस मंत्री, नेत्यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button