रत्नागिरीराजकीय

देवरूख नगर पंचायत निवडणुकीसाठी महाआघाडीची घोषणा

नगराध्यक्षपदासह ८ उमेदवारांची नावे जाहीर

देवरूख दि. ११ (सुरेश सप्रे) :- देवरूख नगरपंचायत निवडणूकीत उबाठा शिवसेना, राष्ट्रवादीे(शप), काँग्रेस, जनता दल, वंचित आघाडी यांची महाआघाडी झाल्याची माहिती माजी मंत्री रवींद्र माने यांनी पत्रकार परिषदेत दिली..

देवरूख शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना सुंदर देवरूख व राष्ट्र प्रथम असा नारा देत सत्तारूढ झालेल्या भाजपायुतीने पाच वर्षे सत्तेत राहून ही सामान्य नागरिकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष न दिल्याने विकासाच्या नावाखाली सत्तेचा दुरुपयोग करून प्रशासनाला हाताशी धरून आपलाच विकास करण्यात मग्न झालेल्यांना आता घरी बसवत शहराच्या सर्वागिण विकासासाठी जनतेने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन माने यांनी केले.

यावेळी महाविकास आघाडी तर्फे नगराध्यक्षापदासाठीच्या उमेदवार म्हणून उबाठा शिवसेनेच्या सौ. सबुरी थरवळ यांची नावाची घोषणा करण्यात आली. तसेच वार्ड नं. ४ मधून महेश पवार (उबाठा) वार्ड नं. ५ सौ. सिध्दी लिंगायत (शप)

वार्ड नं. ६ सौ. शर्मिला अनिल भुवड (काँग्रेस) वार्ड नं. ७ सौ. वैशाली शिंदे वार्ड नं. ९ अनुष्का टीळेकर वार्ड नं. १० निलेश अरुण भुवड (शप) वार्ड नं. १५ निधि इशत्याक कापडी (उबाठा) यांची उमेदवारी ही जाहीर करण्यात आली आहे.

१२वर्ष रखडलेला विकास आराखडा. लाखो रुपये खर्चून ही रस्त्याची झालेली दुर्दशा. वाढलेली अनधिकृत बांधकामे. यासह अनेक प्रश्न त्वरित सोडविण्याचे साठी आमचे अभ्यासू व प्रश्नांची जाण असलेले उमेदवार निवडून आलेवर प्रशासनवर अंकुश ठवत गतीमान कारभार करण्यासाठी कटीबध्द असतील, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी दिली.

या नगर पंचायत निवडणूका एकत्रितपणे महा आघाडी म्हणूनच लढण्यासाठी सज्ज असून आमच्यात कोणतेही वाद विवाद नाहीत. उर्वरित उमेदवारांची नावे अर्ज भरलेवर विजयाच्या निकषावर वर सर्व संमतीने ठरवली जातील.. सर्व उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार हे AB फार्म दिलेवर नक्की करण्यात येणार आहे, असे आर्ते यांनी शेवटी सांगितले.

या पत्रकार परिषदेला रवींद्र माने यांचेसह शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, तालुकाध्यक्ष बाबा साळवी, महिला तालुकाध्यक्ष दिपाली कर्वे, उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, महीला आघाडीच्या सौ. वेदा फडके, युवा सेनेचे छोट्या गवाणकर, दादा शिंदे, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष, काँग्रेसचे अनिल भुवड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button