महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या तयारी संदर्भात महायुतीची मुंबईत बैठक

मुंबई दि. ७ :- रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या तयारी संदर्भात शुक्रवारी मुंबईतील महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रदादा चव्हाण यांच्या रायगड निवासस्थानी महायुतीची  बैठक पार पडली.

या महायुतीच्या बैठकीत महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रदादा चव्हाण, उद्योगमंत्री व रत्नागिरी पालकमंत्री श्री. उदय सामंत आणि राज्य गृहमंत्री श्री. योगेश कदम, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत निवडणूक नियोजन, संघटनाची तयारी आणि रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संघटनेची एकजूट, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेतृत्वाची दिशा, या तिन्हींच्या बळावर रत्नागिरीत आगामी निवडणुकीत निश्चितच यशाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button