रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली विविध ऑनलाइन सात प्रकाराच्या सेवा मिळण्यास आली गतिमानता

राज्य शासनाच्या १५० दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत पोलिस खात्याच्या अंतर्गत मिळणाऱ्या विविध परवानग्या मिळण्यास सुलभता

रत्नागिरी दि. १० :- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे आपले सरकार सेवा पोर्टलवरून विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना देण्यात येतात. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार सेवा पोर्टलवरून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि विहित वेळेत सेवा मिळाव्यात यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

सन 2024/ 25 या काळात ध्वनिक्षेपक परवानासाठी 559 अर्ज दाखल झाले होते त्यापैकी 543 अर्जांना निकाली काढण्यात आले. मनोरंजनाचे कार्यक्रम ना हरकत परवाना यासाठी प्राप्त 27 अर्जांपैकी 26 अर्ज निकाली काढण्यात आले. शोभायात्रा परवानगीसाठी तीन अर्ज आले होते तीनही अर्ज निकाली काढण्यात आले. सभा, संमेलन, मिरवणूक यासाठी एक अर्ज प्राप्त झाला होता तो अर्ज निकाली काढण्यात आला.

हत्यारे परवानी व ना हरकत प्रमाणपत्र यासाठी 49 अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी 42 अर्ज निकाली काढण्यात आले. नोकरी करिता आवश्यक असलेली चारित्र्य पडताळणी याकरिता 24,554 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 21,885 अर्ज निकाली काढण्यात आले. परदेशात जाण्यासाठी आवश्यक असलेली पोलिस अनुमती परवानगीसाठी 112 अर्ज प्राप्त झाले होते. सदर 112 अर्ज निकाली काढण्यात आले. या सर्व सेवा ऑनलाईन असून या ऑनलाइन सेवांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button