महाराष्ट्र

जालना समृद्धी महामार्ग आंदोलन; ना. उदय सामंत यांनी घेतली देवमूर्ती गावातील शेतकरी बांधवांची भेट

नांदेड दि. २६ :- जालना समृद्धी महामार्ग प्रकरणी गेल्या १४० दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या देवमूर्ती गावातील शेतकरी बांधवांची आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी भेट घेतली.

या भेटीत  ना. उदय सामंत यांनी शेतकरी बांधवांशी त्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली आणि लवकरात लवकर या आंदोलनातील सर्व प्रश्नांचे समाधान करण्याचा शब्द दिला.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे देखील  ना. उदय सामंत यांनी सांगितले.

या प्रसंगी माजी मंत्री आणि आमदार अर्जुन खोतकर तसेच शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button