रत्नागिरी

महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक समजून एकदिलाने काम करावे : पालकमंत्री ना. उदय सामंत

देवरुख दि. २५ :- देवरुख येथे आज नगर पंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. मृणाल शेट्ये यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले.

महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक समजून एकदिलाने काम करावे व प्रत्येक उमेदवाराचा विजय निश्चित करावा, असेही आवाहन ना. उदय सामंत यांनी यावेळी केले.

यावेळी व्यासपीठावर सुभाष बने, राजेंद्र महाडिक , विलास चाळके, रोहन बने, प्रमोद पवार, भाजप तालुकाध्यक्ष रुपेश कदम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, अभिजित शेट्ये यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, सहकारी तसेच उमेदवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button