रत्नागिरी
दापोली तालुक्यातील हर्णै गावातील घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्थानिक नागरिकांशी साधला संवाद

रत्नागिरी दि. २८ :- दापोली तालुक्यातील हर्णै गावात घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली तसेच नागरिकांना प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून संबंधित घटनेबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.


