शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची खरी ताकद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेत- संभाजीराव थोरात
रत्नागिरी-निवळी येथे पार पडला शिक्षक नेत्यांचा भव्य प्रवेश

रत्नागिरी दि. २१ :- “महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हा शिक्षकांचा महासागर आहे. येथे प्रत्येकाला न्याय, कर्तृत्व आणि संधी मिळते. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची खरी ताकद या संघातच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून लांजा तालुक्यातील अनेक शिक्षकांनी संघात भव्य प्रवेश केला. हा कार्यक्रम रत्नागिरी-निवळी येथे पार पडला.
यावेळी राज्य कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले, जिल्हा नेते कैलास शार्दूल, जिल्हाध्यक्ष अजय गराटे, उपाध्यक्ष सुरेंद्र रणसे, विकास नलावडे, उर्दू सेल सल्लागार शौकत कारविणकर, मान जिया खान, कुरवले, दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष विलास गोरे, कार्यकारी अध्यक्ष दिलीप तारवे, प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक चंद्रकांत झगडे, कार्याध्यक्ष मंगेश कडवईकर, कोषाध्यक्ष सत्यजित पाटील, कार्याध्यक्ष अंगद आबूज, सचिव संतोष रावणंग, सौ. आंबवकर आदी उपस्थित होते.
या प्रवेशामध्ये लांजा तालुक्यातील शिक्षकांचे नेतृत्व करणारे प्रजाप माने, उमेश केसरकर, प्रभाकर तांबे, दिलीप चव्हाण, विजय कदम, लिंगण्णा भुसनूर, अजय मांडवकर, संदीप निखारगे,श्री नंदकुमार यादव यांच्यासह ४२ शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेत प्रवेश केला.
यावेळी लांजा तालुका अध्यक्ष मंगेश मोरे, राजापूर अध्यक्ष संदीप परटवलकर, रत्नागिरी अध्यक्ष मनोजकुमार खानविलकर, संगमेश्वर अध्यक्ष रवींद्र दरडी, गुहागर अध्यक्ष रवींद्र कुळये, चिपळूण सचिव सुनील चव्हाण, खेड अध्यक्ष श्री. तांदळे, दापोली अध्यक्ष संदीप जालगावकर, मंडणगड अध्यक्ष निलेश देवकर तसेच सर्व तालुका सचिव, कार्याध्यक्ष आणि कोषाध्यक्ष उपस्थित होते. या सभेसाठी मोठ्या संख्येने नवनियुक्त शिक्षण सेवक उपस्थित होते. या सर्वांनी संभाजीराव थोरात यांना मानधन वाढीबाबत निवेदन दिले.



