रत्नागिरीराजकीय

जिप व पं.स आरक्षणाचा अनेकांना फटका

महायुती व महाआघाडीत जागा वाटपातील तिढा सोडवताना नेत्यांचा कस पणाला?

देवरूख  दि. १३ (सुरेश सप्रे) :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटव पंचायत समिती गणांची आरक्षण सोडती जाहीर झाल्याने संगमेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

या निवडणुकीत या नवीन आरक्षणामुळे प्रत्येक पक्षांत इच्छुकांची गर्दी पाहता महायुती व महाआघाडीत जागा वाटपात जोरदार गदारोळ होणेची शक्यता ही वर्तविण्यात येत असून पक्षांतर्गत गटबाजी व शह काटशहाच्या राजकारणामुळे तिकीट वाटपाचा अंदाज घेत काहीजण आपल्या राजकीय भवितव्यासाठी पक्षांतराला ही पेव फुटणेची शक्यता आहे.

मागिल निवडणुकीत विजयी झालेले जिप सदस्य सहदेव बेटकर, शंकर कांगणे, संतोष थेराडे, सौ.रजनी चिंगळे, माधवी गिते यांचे गट आरक्षित झाले असल्याने त्यांचे इतरत्र पुनर्वसन न झाल्यास त्यांचे स्वप्न भंगणार आहे तर रोहन बने, सौ. रचना महाडीक, मुग्धा जागुष्टे, यांचेसह वेदा फडके, नेहा माने यांना पुन्हा जिप सदस्य बनण्याची संधी मिळाली आहे.

तर पंचायत समिती गणात माजी सभापती सुजीत महाडीक. छोट्या गवाणकर.यांचे गण आरक्षित झाल्याने पुन्हा संधी मिळणार नाहीये. तालुक्यात महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाने तर स्वबळाचा नारा देत

गणवार मेळावे घेत आरक्षणाआधीच उमेदवार जाहीर करून कामाला लागा अशा सुचना आम. शेखर निकम यांनीच प्रत्येक गणातील मेळाव्यात दिल्याने महायुतीत जागा वाटपातील तिढा निर्माण होवू शकतो असे आजचे चित्र दिसते आहे.

संगमेश्वर तालुका जिल्हा परिषद गट व पं. स. गण आरक्षण – 

४०- जिप गट

धामापूर तर्फे संगमेश्वर

सर्व साधारण

79)पं.स.गण

धामापूर तर्फे संगमेश्वर

सर्व साधारण

80)पं.स.गण

आरवली

सर्व साधारण महीला

४१- जिप गट

कडवई

सर्व साधारण

81)पं.स.गण

कडवई

सर्व साधारण महीला

82)पं.स.गण

धामणी

सर्व साधारण

४२ जिप गट

कसबा संगमेश्वर

सर्व साधारण महीला

83)पं.स.गण

कसबा संगमेश्वर

नागरीकांचा मागास प्रवर्ग

84)पं.स.गण

परचुरी

सर्व साधारण महीला

४३- जिप गट मुचरी

सर्व साधारण महीला

85)पं.स.गण माभळे

सर्व साधारण

86) पं.स.गण मुचरी

नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला

४४ – जिप गट

कोसुंब

सर्व साधारण

87) पं.स.गण कोसूंब

नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला

88) पं.स.गण निवे बु||

सर्व साधारण

४५ जिप गट

साडवली

सर्व साधारण महीला

89) पं.स.गण साडवली

सर्व साधारण महीला

90) पं.स.गण हातीव

सर्व साधारण

४६- जिप गट

दाभोळे

सर्व साधारण

91) पं.स.गण दाभोळे

अनुसूचित जाती महीला

92) पं.स.गण कोंडगाव

सर्व साधारण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button