क्रीडारत्नागिरी

रत्नागिरीतील देवळेकर बहिणींची नेमबाजीत सातत्याने उत्तुंग कामगिरी

रत्नागिरी दि. १७ :- 9 ते 15 ऑक्टोबर 2025 रोजी भोपाळ मध्य प्रदेश येथे झालेल्या 34 व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळंकर शूटिंग चॅम्पियनशिप रायफल 50 मीटर खेळ प्रकारात युथ वुमन या गटामध्ये कार्तिकी मानस देवळेकर 5 स्थानी तर वरा मानस देवळेकर हिने 22 स्थान निश्चित करून राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकरिता पात्र झाले आहेत. त्या भोपाळ येथे होणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्य रायफल संघटनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यापूर्वी कार्तिकी व वरा मानस देवळेकर या शॉटगन ट्रॅप व डबल ट्रॅप या खेळातही उत्तुंग कामगिरी करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या दोघींना प्रशिक्षक म्हणून प्रख्यात नेमबाज मोहनीश नंदकुमार हिरवे यांनी बालेवाडी पुणे येथे प्रशिक्षण दिले.

देवळेकर बहिणींच्या या यशाबद्दल सिद्धांत रायफल अँड पिस्टल शूटिंग क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, सचिव व प्रशिक्षक किसन खारके राष्ट्रीय नेमबाज अलंकार कोळी प्रसिद्ध उद्योजक सौरभ सुरेश मलूष्टे व मित्र परिवारातर्फे अभिनंदन करत त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button