क्रीडारत्नागिरी

लांजा-राजापूर-साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी केली रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या कामाची पाहणी

रत्नागिरी दि. ४ : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष आणि लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या वेळी त्यांनी कामाच्या गतीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

आमदार सामंत यांनी सांगितले की, “रत्नागिरीसारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाने नटलेल्या शहराला आधुनिक क्रीडा सुविधा मिळणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियम हे खेळाडूंना उत्तम व्यासपीठ ठरणार असून येथे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेता याव्यात यासाठी दर्जेदार काम झाले पाहिजे.” पाहणी दरम्यान त्यांनी कामाच्या गुणवत्तेवर विशेष भर देत क्रीडा प्रेमी व खेळाडूंच्या अपेक्षा पूर्ण होतील याची खात्री करण्याचे आश्वासन दिले.

या पाहणीवेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे पदाधिकारी, क्रीडा विभागाचे अधिकारी तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button