रत्नागिरी

आंबेड बुद्रुक येथे श्री गणेश विसर्जन घाटाचे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ वर्षा परशुराम ढेकणे यांच्या हस्ते लोकार्पण

प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून घाटाची उभारणी

संगमेश्वर दि.२७ :- आंबेड बुद्रुक ता. संगमेश्वर येथील तेलीवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून बांधण्यात आलेल्या श्री गणेश विसर्जन घाटाचे लोकार्पण शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या सोहळ्याच्या वेळी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे लोकार्पण भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या शुभहस्ते झाले. त्यांच्या हस्ते नारळ फोडून व फीत कापून घाटाचे लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी आपल्या मनोगतात बोलताना सौ. वर्षा परशुराम ढेकणे म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  श्री. रवींद्र चव्हाण साहेब हे नेहमी लोकाभिमुख दृष्टीकोनातून काम करतात. जनतेच्या गरजा समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. ग्रामस्थांची जुनी मागणी ओळखून त्यांनी स्वनिधीतून हा घाट उभारण्यास हातभार लावला आहे. हा उपक्रम म्हणजे भाजपच्या जनसेवेच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे तसेच जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांचे मोलाचे सहकार्य कायम असते

या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा सौ. नुपुरा उन्मेष मुळ्ये, मंडल अध्यक्ष श्री. प्रतीक देसाई, महिला मोर्चा मंडलअध्यक्षा सौ प्रियल जोशी मध्य मंडळ सरचिटणीस श्री. राजेश आंबेकर, जिल्हा सचिव (महिला मोर्चा) सौ. सरिता आंबेकर यांच्यासह अनुष्का शेलार, अनुश्री आपटे, प्रज्ञा टाकळे, भक्ती दळी, गावकर श्री. चंद्रकांत रहाटे, श्री. गंगाधर रहाटे, श्री. सुधाकर टाकळे, श्री. हरिश्चंद्र गुरव, माजी सरपंच श्री. दिनेश गुरव, आंबेड उपसरपंच श्री. शोएब भाटकर, संदीप रहाटे, माजी उपसरपंच सौ. स्मिता रहाटे, श्री. प्रशांत जोशी, श्री. उन्मेष मुळ्ये, श्री. सतीश पटेल, श्री. मंगेश साळवी, श्री. विश्वास शिगवण, सौ. अपर्णा शिगवण यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण  व भाजप नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी “भाजप कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळेच अशा उपक्रमांना यश मिळते,” असे वक्त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button