महाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या महाराष्ट्र पदाधिकारी अभ्यासवर्ग उद्घाटन कार्यक्रमास ना. उदय सामंत यांची उपस्थिती

मुंबई दि. २७ :- भाईंदर येथे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या पदाधिकारी अभ्यासवर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थित राहून महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसंबंधी सविस्तर माहिती दिली.

यावेळी ना. उदय सामंत यांनी सांगितले की, “महायुती सरकार हे फक्त उद्योग आणणारे सरकार नाही, तर महाराष्ट्राला औद्योगिक महासत्ता बनवणारे सरकार आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता, आपण केलेलं काम पुराव्यानिशी जनतेपर्यंत पोहोचवणं ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे.”

रेकॉर्डब्रेकिंग गुंतवणूक आणि रोजगार:

आतापर्यंत 20.42 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक MOU राज्यात झाले असून 84% अंमलबजावणी झाली आहे.

महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

“वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट”, फार्मास्युटिकल पार्क, स्टील इंडस्ट्री हब – गडचिरोली यांसारख्या उपक्रमांमुळे औद्योगिक समतोल साधला गेला आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत आतापर्यंत 65,000 पेक्षा अधिक उद्योजक घडवले गेले आहेत.

महिलांसाठी विशेष उद्योग मेळावे आयोजित केले जात आहेत.

‘विश्वकर्मा योजना’मुळे पारंपरिक कौशल्याधारित व्यवसायांना बळ मिळत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, पुणे-मुंबई प्रवास वेळेत झालेली कपात यामुळे उद्योगांसाठी महाराष्ट्र हे सर्वात अनुकूल राज्य बनले आहे, असे यावेळी मा. ना. उदय सामंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button