रत्नागिरी

भटकी कुत्री, मोकाट जनावरे आणि मुख्य रस्त्यावरील खड्डे यामुळे देवरूखकर समस्यांच्या गर्तेत!

मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ संपता संपेना ! खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता; सर्वसामान्यामधे संतापाची लाट

देवरूख दि . २२ (सुरेश सप्रे) – देवरूख शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ संपण्याचे चिन्ह दिसत नसुन चोरपऱ्या ते बसस्थानक या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर देवरूख नगर परिषदेने गणपती सणाआधी थातूरमातूर मलमपट्टी केल्यानंतर आता शहरातील मुख्यरस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे . मुख्यरस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यान्मुळे अपघाताचा धोका वाढला असुन स्थानिक पातळीवरील सर्व पक्षिय लोकप्रतिनिधींचे ही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकाना आता कोणीच वाली नसल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत . त्यातच बेशिस्त पार्किंग होत असलेने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

वर्षापुर्वी शहरातील अनेक रस्त्याच्या कामासाठी देवरूख नगर पंचायतीने लाखों रुपयांचा निधी खर्च केला होता. त्यानंतरच्या पावसाळ्यातच हा रस्ता खड्डेमय झाला. त्यावर झालेली मलमपट्टीही पुन्हा पावसात वाहुन गेल्याने शहरवासियांच्या पाठीशी जे खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ लागले ते आजतागायत कायम आहे.

आता देवरूखात या खड्ड्यांवरुन राजकिय आखाडाही चांगलाच रंगलेला दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पडलेल्या खड्ड्यांवर उपाययोजना करण्यात यावी म्हणुन यापुर्वी सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या पदाधिकारी यांनी नपवर धडक देत अधिकारी वर्गाला धारेवर धरले. असे असले तरी आपल्या सत्ताकाळात झालेली विकास कामे पारदर्शकतेने केली होती का? असा सवाल जनतेतून व्यक्त होत आहे. प्रशासकीय काळापुर्वी लाखोरुपये खर्चुन झालेले रस्ते ही दोन वर्षांताच खड्डेमय झाले होते. त्यावर प्रशासकीय काळात झालेल्या कामांत रस्ते खड्डेमुक्त होतीलअसे वाटत असतानाच पुन्हा या पावसाळ्यात तहसिल कार्यालयते मातृमंदिर रस्ता, चोरपऱ्या- पंचायत समिती ते एसटी बसस्थानक रस्ता, नगर पंचायत ते मशिद, बसस्थानक ते भुमी अभिलेखकार्यालय आदी रस्ते खड्डेमय झाले आहेत .

रस्त्यावर पडलेल्या या खड्डयांमुळे वाहन चालकाना कसरत करावी लागत असुन या खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे . त्यातच मोकाट जनावरे , भटकी कुत्री व का ठिकाणी रस्त्यावर बेशिस्त लागणाऱ्या हातगाड्या यामुळे वाहतूक कोंडी व मुख्य रस्त्यावरील खड्डेवरील प्रवास मृत्युच्या दारात घेवुन जाणारा असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतुन उमटत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button