रत्नागिरी

संगमेश्वर तालुक्यातील मौजे- कोंडीवरे येथे दोन मृत रानकुत्र्यांना (कोळसुंदे) खड्डयात पुरल्याप्रकरणी दोन संशयितांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी दि. २० :- संगमेश्वर तालुक्यातील मौजे- कोंडीवरे येथे दोन मृत रानकुत्र्यांना (कोळसुंदे) खड्डयात पुरल्या प्रकरणी दोन संशयितांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये शेती संरक्षणासाठी वापरलेली तार, झटका मशीन, बॅटरी, वायर, चिमटा वायर, फावडा आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १९ रोजी सकाळी ११:०० वा. दरम्यान श्री. दिनेश राजाराम कदम यांनी मौजे- कोंडीवरे, ता. संगमेश्वर येथील कणकीचे सपाट येथे साबुदाणा बागेच्या कंपाऊंडला लावलेल्या विद्युत तारेचा शॉक लागुन रानकुत्रे (कोळसुंदे) दोन मृत झाल्या बाबतची माहिती वनविभागाला दिली. ही माहिती मिळ्यानंतर वन विभागाचे अधिकारी सर्व स्टाफ सह जागेवर जावून वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यावेळी सदर तारेच्या कंपाऊंड जवळ वन्यप्राणी रानकुत्रे-२ हे जागेवर आढळून आले नाहीत.

त्यांनतर सदर साबुदाणा बागेची देखरेख करणारे इसम यांना सदर घटनेबाबत विचारणा केली असता रानकुत्रे-२ मृत ठिकाणापासून उचलून बागेमध्येच खड्डा काढुन पुरलेले ठिकाण दाखविले. त्यानंतर सदरचा खड्डा उकरुन पुरलेले रानकुत्र्याची मादी-१ व नर-१ असे सदरचे २ वन्यप्राणी पुढील तपासासाठी ताब्यात घेऊन व सदर घटनेबाबत १) जॉर्ज.पी.व्ही मुळ गाव- कन्नूर, केरळ २) घनश्याम मुळ गाव- लखिमपूर, उत्तर प्रदेश दोघे सध्या राहणार कोंडीवरे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांना पुढील तपासासाठी ताब्यात घेऊन शेती संरक्षणासाठी वापरलेली तार, झटका मशीन, बॅटरी, वायर, चिमटा वायर, फावडा आदी साहित्य जप्त करुन वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वनपाल संगमेश्वर (देवरुख), यांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी आवश्यक कागदपत्र तयार करून पुढील तपास चालू आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शेटे, डाॅ. बेलुरे, डाॅ. सोनाली शेटे यांचेकडून तपासणी करून शवविच्छेदन करून घेण्यात आले आहे. सदरची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कार्यवाहीसाठी श्री. प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, श्री. सागर गोसावी वनपाल संगमेश्वर (देवरुख), वनरक्षक श्री. सुरज तेली, आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे यांनी ही कार्यवाही केली असून, पोलीस पाटील कोंडीवरे राजेंद्र मेणे, दिनेश गुरव, झाकिर शेकासन, अंकित कदम, विजय कदम यांचे सहकार्य लाभले. अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडत असल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button