रत्नागिरी

देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची योजक फॅक्टरीला क्षेत्रभेट

रत्नागिरी दि. ३१ ऑगस्ट : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘योजक फॅक्टरी’ येथे विशेष शैक्षणिक क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शैक्षणिक क्षेत्र भेटीमध्ये कला शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष अर्थशास्त्र विषयाच्या एकूण १६ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. क्षेत्रभेटीदरम्यान ‘योजक फॅक्टरी’च्या व्यवस्थापकीय संचालिका दया भिडे यांनी विद्यार्थ्यांना कारखान्याची पार्श्वभूमी, उत्पादन साखळी, कच्च्या मालाचे व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण आणि बाजारपेठेतील विपणन याबद्दल सविस्तर माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी औद्योगिक अर्थशास्त्र व उद्योजकतेविषयी विचारलेल्या विविध प्रश्नांचे आणि शंकांचे त्यांनी अतिशय सोप्या भाषेत निरसन केले.

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता औद्योगिक अर्थशास्त्र, स्थानिक उत्पादन प्रक्रिया, लघु व मध्यम उद्योगांचे व्यवस्थापन आणि रोजगार निर्मिती यांसारख्या व्यावहारिक घटकांची प्रत्यक्ष माहिती मिळवून देणे, हा या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश होता. क्षेत्रभेटीचे नियोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मार्था कीर व प्रा. श्रुती भोसले यांनी केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button