रत्नागिरी

अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात तालुकास्तरावर ताम्हाणेची रिया गिजे प्रथम, पैसाफंड संगमेश्वरची क्रीशा इंदानी द्वितीय

संगमेश्वर दि.२६ ऑगस्ट ( प्रतिनिधी ):- अखिल भारतीय विज्ञान मेळावा २०२६ ,संगमेश्वर तालुक्यात उत्साहात संपन्न झाला. भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७,भवितव्य(संधी) आणि आव्हाने असा विद्यार्थ्यांना सादरीकारणासाठी विषय होता. यामध्ये ताम्हाने हायस्कुल च्या रिया रवींद्र गिजे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर पैसाफंड संगमेश्वर च्या क्रीशा कपिल इंदानी हिने द्वितीय क्रमांक पटकावला.ह्या दोन्ही विद्यार्थिनींची निवड जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

या स्पर्धेत अर्णव सागर सकपाळ तृतीय(पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल देवरुख),ध्रुव कौस्तुभ जोशी (न्यू इंग्लिश स्कूल देवरुख) तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. तर मीरा अनंत लिंगायत (दादासाहेब सरफरे विद्यालय) उत्तेजनार्थ,सृष्टी सोमनाथ सराटे (कसबा हायस्कुल) उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याला नियमानुसार सहा मिनिटाचा कालावधी देण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभाविपणे सादरीकरण केली.या स्पर्धेत एकूण आठ शाळा सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेचे परीक्षण प्रा.गौरव पोंक्षे,प्रा प्रशांत जाधव,प्रा.पृथ्वीराज वाडकर यांनी केले.दरम्यान यावेळी संगमेश्वर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संदीप जाधव, उपाध्यक्ष अमृत मेंगाल, कोषाध्यक्ष सुरज कदम, सचिव विनोद सरदेसाई, सौ अर्चिता कोकाटे आदी उपस्थित होते.

ही स्पर्धा देवरुख येथे पंचायत समिती च्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झाली.पैसा फंडच्या क्रिशा इंदानी हिच्या या उज्वल यशाबद्दल व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी अभिनंदन केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button