रत्नागिरी

सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमध्ये ३१ ऑगस्टपासून पावसाळी कला प्रदर्शन

संगमेश्वर दि. २६ ऑगस्ट ( प्रतिनिधी ) :- सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘पावसाळी कला प्रदर्शन २०२६’ आयोजित करण्यात आले आहे. या कला प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर गोविंदराव निकम राहणार असून, उद्घाटक म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला सह्याद्री शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इसाक महंमद खतीब, उपाध्यक्ष युगंधरा प्रकाश राजेशिर्के, उपाध्यक्ष प्रशांत गोविंदराव निकम, कार्याध्यक्ष अनिकेत शेखर निकम, सेक्रेटरी महेश मनोहर महाडिक तसेच सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे चेअरमन प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या प्रदर्शनाचे नियोजन सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्रभारी प्राचार्य प्रा. माणिक शिवाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. कृतिका खामकर, सांस्कृतिक प्रतिनिधी कु. चिन्मय वडपकर आणि जनरल सेक्रेटरी कु. सिद्धार्थ भोसले सहभागी आहेत.३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सह्याद्री कलादालन, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सह्याद्री कला महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के व प्राचार्य माणिक यादव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button