रत्नागिरी

मालगुंड येथे कवितेच्या राजधानीत बरसल्या श्रावणधारा;  साहित्यिक उपक्रम ठरला लक्षवेधी

गणपतीपुळे दि. २३ ऑगस्ट (वैभव पवार) :-  कवि केशवसुतांचे जन्मगाव असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड व युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “श्रावणधारा मनामनातील” या साहित्यिक उपक्रमात बालकवी, युवाकवी व जेष्ठ कवींनी सादर केलेल्या कवितेतून श्रावणधारा बरसल्या व श्रोते त्यात चिंब न्हाऊन गेले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी केशवसुत स्मारकातील कवी केशवसुतांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यानंतर कार्यक्रमास्थळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमासाठी कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष आबा तथा गजानन पाटील, मालगुंड शाखाध्यक्षा नलिनी खेर, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका श्रध्दा कळंबटे, दक्षिण कोकण युवाशक्ती प्रमुख अरूण मोर्ये , मालगुंड शाखा सचिव विलास राणे, मालगुंड युवाशक्ती प्रमुख अमेय धोपटकर, डॉ. संतोष केळकर, शुभदा मुळ्ये, उज्ज्वला बापट, शिरीष लिंगायत, रमानंद लिमये सर, रविंद्र मेहंदळे , रोहीणी सावंत, स्मिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थी वर्गाने उत्तमोत्तम कविता सादर केल्या. स्वरचित कविता लिहून सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे यशिका विनायक भोसले जि. प. शाळा निवेंडी भगवतीनगर प्रथम , सौमी सुशिल भुते जि.प.शाळा निवेंडी भगवतीनगर द्वितीय, अनुष्का मयुर पाटील मालगुंड शाळा नं.१ तृतीय तर उत्तेजनार्थ माऊली मंदार पात्ये मालगुंड शाळा नं १ व तन्मय प्रशांत मांडवकर जि.प.शाळा गणपतीपुळे यांना सन्मानपदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तर सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

युवा गटातील अमृता नवाथे, मालवी होरंबे, श्रृती फुटक व स्वरांनी गोरे यांनी सादर केल्या. जेष्ठ कवी या विभागातून श्रद्धा कळंबटे, विलास राणे, रोहिणी सावंत उज्ज्वला बापट यांनी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. गिरीश जोशी व हर्ष बोंडले यांनी हार्मोनियम व तबल्याच्या संगतीने कवी अमेय धोपटकर यांच्या कविता सादर केल्या. अशा सर्वांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व लेखणी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय धोपटकर व विलास राणे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोमसाप मालगुंड शाखेचे पदाधिकारी व कवी केशवसुत स्मारक समिती, वाचनालयाचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button