तरवळ येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नंदकुमार कुवार यांची निवड

तरवळ दि. २२ ऑगस्ट (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मौजे तरवळ आगवे यांच्या अधिपत्याखालली असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती या समितीच्या अध्यक्ष पदी तरवळ येथील तरुण तडफदार कार्यकर्ते नंदकुमार शिवाजी कुवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नंदकुमार शिवाजी कुवार सामाजिक राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे योगदान देत आहेत, ते करबुडे विभागाचे शिवसेना (शिंदेगट)युवासेना विभाग प्रमुख देखील आहेत. ग्रुप ग्रामपंचायत तरवळ आगवे या ग्रामपंचायत ची १५ ऑगस्ट ची तहकूब झालेली सभा दिनांक २१ ऑगस्ट रोजी घेण्यात आली, आणि सभेमध्ये सर्वानुमते त्यांची बिनविरोध करण्यात आली.
गावामध्ये सामाजिक सलोखा राखून प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कायमच सतर्क राहीन. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. मी माझ्या पदाला योग्य न्याय देईन, पक्षपात पणा करणार नाही. अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवली आहे.
नंदकुमार शिवाजी कुवार यांची तरवळ येथील तंटामुक्त समिती च्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



