रत्नागिरी

मालगुंड विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

तरवळ दि. २१ ऑगस्ट (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड मधील दोन विद्यार्थिनींची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ इयत्ता सातवी या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून परीक्षेमध्ये प्रशालेतील दुर्वा योगेश सुर्वे या विद्यार्थिनीची तालुका गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. तसेच जि. प. शाळा वरची निवेंडी या शाळेतून उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट झालेली व सध्या मालगुंड प्रशालेत शिक्षण घेत असलेली आर्या मोहन शिगवण ही विद्यार्थिनी देखील गुणवत्ता यादीत झळकली आहे.

या दोन्ही विद्यार्थिनींनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून जिद्द, चिकाटी, मेहनत घेऊन या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करून गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. या विद्यार्थिनींना प्रशालेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून गुणवत्ता यादीत झळकलेल्या या दोन्हीं विद्यार्थिनींचे प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर ,पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल उर्फ बंधू मयेकर, तसेच उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत ,खजिनदार संदीप कदम ,सहसचिव श्रीकांत मेहंदळे तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

तसेच उज्ज्वल यश संपादन करून शाळेचे तसेच आपल्या गावचे नाव उज्वल करणाऱ्या या दोन ही गुणवत्ता धारक विद्यार्थिनींचे परिसरातून कौतुक तसेच अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button