रत्नागिरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

रत्नागिरी दि. २५ जुलै : महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी रत्नागिरी आणि उत्कर्ष सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबिराचे आयोजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजू भाटलेकर यांनी केले होते.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाडेकर, मनोज पाटणकर, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, भक्ती दळी, संदीप सुर्वे, प्रशांत घाणेकर, अजिंक्य केसरकर, शैलेश बेर्डे, शोनाली आंबेरकर, मंदार खंडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक कांबळे सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले. शिबिराचे प्रास्ताविक करताना राजू भाटलेकर यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले व शिबिराचा उद्देश सांगितला. शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली व सामाजिक जाणिवेतून भाजप करत असलेल्या कामाबद्दल सविस्तर सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button