रत्नागिरी

गेल्या २० वर्षांत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर एकही घोटाळ्याचे आरोप झाले नाहीत – अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे

रत्नागिरी दि. २५ जुलै :- गेल्या वीस वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पद भूषवत असताना बँकेच्या एकही सभासदाने कुठल्याही प्रकारे घोटाळे झाल्याचं आरोप केले नाही. आमच्या एकही संचालकाने कुठले कर्ज घेतले नाही किंवा बँकेची फसवणूक केली नाही. उलट बँक राज्यात दुसऱ्या स्थानापर्यंत पोचली. मात्र आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खेड मतदारसंघातील काही लोक सभासद नसतानाही बँकेवर वाईट साईट आरोप करत आहेत. बँकेबाबत अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तमाम सभासदांनी आणि मतदारांनी आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत चांगली प्रतिमा असलेले, सुशिक्षित, बँकिंग क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांनाच संधी द्यावी असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी डॉ. तानाजीराव चोरगे व्यासपीठावरून बोलत होतेयावेळी पुढे बोलताना श्री.चोरगे म्हणाले की २००० साली मी बँकेचे संचालक नसताना मी कर्ज घेतले आणि कोकणातील कृषी महाविद्यालय सुरू केले त्यामुळे अनेक मुलांना कृषी महाविद्यालयाचा फायदा झाला. कर्ज घेते वेळी मी आमची जमीन सुद्धा तारण ठेवली.

आम्ही सर्व पक्षाचे संचालक आहोत बँकेत कधीही राजकारण केले नाही. बँक ही एक वित्तीय संस्था आहेत्यामुळं त्याला शिस्त आवश्यक असते. भ्रष्टाचार झाले असते. घोटाळे झाले असते तर नाबार्ड, आर बी आय यांनी आमच्यावर कारवाई केली असती. मात्र आज बँकेची स्थिती खूप चांगली आहे. राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सभासदांनी करडी नजर ठेवून बँकेच्या कारभाराकडे लक्ष ठेवावे आणि चुकीचे काही दिसत असल्यास त्या त्या वेळच्या संचालकांना चुका दाखवून द्याव्यात असे मत डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केले.

या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, तज्ज्ञ संचालक रमेश कीर, ऍड. दीपक पटवर्धन, मंदार सप्रे, आबा टिळेकर, अमजद बोरकर, सौ. नेहा माने आदींसह सर्व संचालक व सभासद, बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button