रत्नागिरी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गणपतीपुळे मंदिरात शिवसैनिकांकडून प्रार्थना!

गणपतीपुळे दि. २८ जुलै  (वैभव पवार) :-  महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त मालगुंड शाखा कोतवडे जिल्हा परिषद गट युवासेने मार्फत गणपतीपुळे मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाच्या चरणी त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि पुन्हा एकदा भगव्याचे राज्य महाराष्ट्रात येवो अशी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.

याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र शिंदे, जिल्हा संघटक संजय पुनस्कर , विभागप्रमुख उत्तम मोरे, युवा सेना तालुका समन्वयक साईनाथ जाधव, युवासेना उप तालुका रोहित साळवी, माजी उपसरपंच संतोष चौघुले, उपशाखाप्रमुख पंकज खेऊर, उपशाखाप्रमुख हरिनाथ शिवगण, ज्येष्ठ शिवसैनिक जगन सुर्वे, अरुण पवार, गणपतीपुळे येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष समीर कदम आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button