नाना साहेब शेट्ये यांचा ३३ वा स्मृतिदिन १ ऑगस्ट रोजी
विद्यार्थी गुणगौरव समारंभ व स्मृती पुरस्कारांचे वितरण

देवरुख दि. २७ जुलै ( प्रतिनिधी ):- कोंडगाव (साखरपा) येथील सर्वसामान्यांचे सर्वमान्य नेतृत्व व गोरगरीबांचे कैवारी दिवंगत नानासाहेब शेट्ये यांचा ३३ वा स्मृतीदिन शनिवार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी ‘नाना’ शेट्ये सभागृह साखरपा येथे संपन्न होणार आहे. कै.नानासाहेब शेट्ये स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे आहे.
या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी कै . नानासाहेब शेट्ये स्मारक समिती (ग्रामिण) चे अध्यक्ष दत्ताराम शिंदे हे असणार आहेत तर प्रमूख पाहूणे म्हणून राजापूर- लांजा- साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, मुंबईचे प्रसिध्द उद्योगपती विष्णूशेठ रामाणे व विजय बाईग – प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय व ज्युनि. कॉलेज, साखरपा हे उपस्थित रहाणार आहेत.
या समारंभात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पंचकोशीमधील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, १० वी प्रथम क्रमांक विद्यार्थी १२ वी च्या सर्व शाखांमधून प्रत्येक शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी आणि कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कै. नानासाहेब शेट्ये यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या व्यक्ती व संस्था पुरस्कार सन २०२६ चे वितरण होणार आहे.
सन २०२६ च्या व्यक्ती पुरस्कारासाठी कोट गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच शांताराम आत्माराम ऊर्फ आबा सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे तर संस्था पुरस्कारासाठी खेड तालूक्यालील ग्राम विकास संघ, कुंभाड, मुंबई या संस्थेची निवड झाली आहे.
तरी या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नानांवर प्रेम करणार नागरीक नानांचे कुटुंबीय व नातेवाईक बक्षीसपात्र विद्यार्थी व त्यांचे पालक, पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था, त्यांचे हितचिंतक,यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष संदेश ऊर्फ बापू शेट्ये, सरचिटणीस संतोष केसरकर, ग्रामिण समितीचे कार्याध्यक्ष गणपत शिर्के, चिटणीस रमाकांत शिंदे, खजिनदार मारुती शिंदे, रमाकांत शेट्ये, मनोहर पोतदार, अब्दुल हमीद खतीब , दीपक शेट्ये , प्रसाद कोलते, मिलींद भिंगार्डे , विरेंद्र शेट्ये, सुहास कदम यांनी केले आहे.



