रत्नागिरीसामाजिक

कै. नाना साहेब शेट्ये स्मृती पुरस्कार जाहिर; व्यक्ती पुरस्कार शांताराम सुर्वे यांना जाहीर

संस्था पुरस्कार ग्रामविकास संघ कुंभाडला जाहीर; १ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण

संगमेश्वर दि. २२ ( प्रतिनिधी ):- कोंडगाव (साखरपा) येथील सर्वमान्य थोर समाजसेवक कै . नानासाहेब शेट्ये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रातिवर्षी कै. नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती व संस्था पुरस्कार दिले जातात. यासाठी वर्तमानपत्र व सोशल मिडीयाच्या माध्यमातून अर्ज मागविले जातात. संस्था नियुक्त निवड समितीमार्फत योग्य व्यक्ती व संस्था यांची निवड केली आहे.व्यक्ती पुरस्कार शांताराम सुर्वे यांना तर संस्था पुरस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती ग्रामविकास संघ कुंभाडला जाहीर झाला आहे.

यावर्षी पुरस्कारासाठी अनेक अर्ज प्राप्त झाले. निवडसमिती सदस्यांनी एकमताने कै . नानासाहेब शेट्ये स्मृती पुरस्कार २०२६ ची निवड केली आहे. गावच्या प्राप्त अर्जामधून कै. नाना साहेब शेट्ये स्मृती व्यक्ती पुरस्कारासाठी मु.पो. कोट ता. लांजा येथील जेष्ठ निःस्वार्थी समाजसेवक, गावचे माजी सरपंच तथा ऐतिहासिक कोट गावच्या विकासाचे शिल्पकार शांताराम आत्माराम ऊर्फ आबा सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. अजातशत्रू असले‌ले आबा सर्वसामान्यांचे आधारवड मानले जातात. तसेच संस्था पुरस्कारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती ग्रामविकास संघ-कुंभाड, मुंबई या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

ही संस्था गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधा पूर्ण करण्यासाठी सातत्या‌ने प्रयत्नशील आहे. या संस्थेची २६ गुंठे स्वमालकीची आगा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारुन शिवस्मारक उभारले आहे.भावी पिढीला सुयोग्य मार्गदर्शन होण्यासाठी व विविध खेळांच्या उत्कर्षासाठी या संस्थेमार्फत भव्य फ्रीडा संकुल उभारण्यात येत आहे-परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, गौरवप्राप्त व्यक्तिंचा सन्मान व सर्वांमध्ये स्नेहभाव वृद्धींगत व्हावा यासाठी वार्षिक मेळावा इ. माध्यमातून ही संस्था सामाजिक बांधीलकी जपत आहे.

यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था यांचे संस्थेचे अध्यक्ष संदेश ऊर्फ बापूसाहेब शेट्ये, सरचिटणीस संतोष केसरकर, ग्रामीण समितीचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे, कार्याध्यक्ष गणपत शिर्के, चिटणीस रमाकांत शिंदे, खजिनदार मारुती शिंदे, रमाकांत शेट्ये व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.या पुरस्कारांचे वितरण कै. नानांच्या स्मृतीदिनी १ ऑगस्ट २०१६ रोजी नाना शेट्ये सभागृह, साखरपा येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button