क्रीडारत्नागिरी

इंग्लंडमध्ये सुरू असणाऱ्या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये रत्नागिरीच्या अविराजची धमाकेदार कामगिरी!

११६ रन्सची नाबाद खेळी बरोबर घेतल्या ४ विकेट्स; पुन्हा एकदा ठरला सामनावीरचा मानकरी!

रत्नागिरी दि. २० :- इंग्लंडमध्ये सुरू असणाऱ्या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये रत्नागिरीचा सुपुत्र अविराज अनिल गावडे याची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. या सामन्यात ११६ रन्सची नाबाद खेळी करून, गोलंदाजीत चार विकेट्स घेत आपल्या संघाला विजय मिळवून देणारा अविराज आपल्या संघासाठी तारणहार ठरला आहे. या अष्टपैलू खेळीच्या जोरावर अविराज पुन्हा एकदा सामनावीरचा मानकरी ठरला.

इंग्लंडमधील मिडलसेक्स काउंटी क्रीकेटमधील शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये पेशवा क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सलामीलाच फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या अविराजने अतिशय सुंदर फलंदाजी करताना १५ चौकार तर ३ उत्तुंग षटकार मारत ११५ बॉलमध्ये ११६ रन्सची नाबाद शतकी खेळी केली. अविराजने १०० च्या स्ट्राईक रेटने धावा करत आपल्या संघाला ४३ ओव्हर्समध्ये १८० ची धावसंख्या उभारण्यासाठी मोलाचा हातभार लावला.

सलामीला उतरलेल्या अविराजने शेवटपर्यंत राहत आपल्या नाबाद संघाला मजबूत धावसंख्या उभाख्यात सिंहाचा वाटा उचलला.

प्रत्युत्तरादाखल लंडन डेस्परॅडोज संघाने ३५ षटकांमध्ये फक्त १७० धावसंख्या गाठली. अविराजने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाचे सुरुवातीचे ४ फलंदाज तंबूत पाठवले. अविराजने ९ ओव्हर्स गोलंदाजी करताना आपल्या ४ विकेट्स घेतल्या व संघाला विजय मिळवून दिला.

अविराजने नाबाद ११६ रन्स व ४ विकेट्स घेत, आपल्या अष्टपैलू कामगिरीने सामनावीर पुरस्कारावर आपले नाव कोरले. तिसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या अविराजच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button