
विल्ये दि. १८ जुलै (अमित कांबळे) :- रत्नागिरीतील खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था गेले अनेक वर्ष सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहे. त्याच अनुषंगाने तारीख १७/७/२०२६ रोजी या परिसरातील शेतकरी वर्गासाठी शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
खंडाळा या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. या मेळाव्यात तज्ज्ञांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, उदा. पंतप्रधान किसान सन्मान निधी ,नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांचा लाभ कसा घ्यावा, याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन:
कृषी अधिकाऱ्यांनी मृदा परीक्षण, पीक विमा आणि ठिबक सिंचन अनुदानाबद्दल सविस्तर माहिती दिली.
शंकांचे निरसन: उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रश्नांवर थेट चर्चा करून समाधानकारक उत्तरे देण्यात आली.
योजनांची माहिती: शेतकऱ्यांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य मिळवून देणाऱ्या योजनांच्या अर्जांची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.या मेळाव्यात मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी व योजनांचा लाभ घेण्यासाठी येत्या काळात खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
फळबाग लागवड योजनेंतर्गत आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम फणस लागवड,कृषी यांत्रिक यांत्रिककिकरण योजना कृषी अवजारे गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना – ठिबक, तुषार सिंचन योजना, शेततळे, पॅक हाउस, रायपनिंग चेंबर, आंबा पुनरूज्जीवन, कृषी प्रक्रिया गटशेती महाविस्तार, AI application इ.बाबत उपकृषी अधिकारी प्रदीप भुवड यांनी अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.तसेच कृषी मंडळ अधिकारी विकास मेढे,वर्षा नवलकर यांनीही शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहून विशेष माहिती दिली.



