रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन संस्थेच्या रत्नागिरी तालुका संघटकपदी मालगुंडचे शिरीष लिंगायत यांची निवड!

गणपतीपुळे दि. १७ जुलै (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे सुपुत्र तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मालगुंड शाखेचे एकनिष्ठ शिवसैनिक शिरीष शंकर लिंगायत यांची रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत रत्नागिरी तालुका संघटक या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र त्यांना संबंधित संस्थेमार्फत प्राप्त झाले आहे. त्यांची तालुका संघटक पदी निवड झाल्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मालगुंड शाखेमार्फत त्यांचा नुकताच यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रकाश जाधव,माजी तालुकाप्रमुख राजेंद्र शिंदे. युवासेना तालुका समन्वयक साईनाथ जाधव, युवासेना उपतालुकाप्रमुख रोहित साळवी. शाखाप्रमुख बावा आग्रे, उपशाखाप्रमुख हरीनाथ शिवगण,उपशाखा प्रमुख पंकज खेऊर, वसंत फडकले, जगन सुर्वे, राजू गुरव, महेश फडकले,सागर मांडवकर उपस्थित होते . या सत्कार कार्यक्रमात त्यांचे मालगुंड शाखेमार्फत अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
शिरीष लिंगायत हे शैक्षणिक व सामाजिक कार्यातील अतिशय सक्रिय असे व्यक्तिमत्व असून त्यांनी यापूर्वी मालगुंड येथील जीवन शिक्षण प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष म्हणून काम केले आहे .तसेच मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक समितीच्या अंतर्गत असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखेचे तसेच मालगुंड तंटामुक्त समितीचे ते सदस्य आहेत.
तसेच गावातील विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची रिझनल टीचर्स ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत तालुका संघटक पदी निवड झाल्याचे सांगण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचे संपूर्ण मालगुंढ परिसरातून अभिनंदन होत आहे.



