
विल्ये दि. १६ (अमित कांबळे) :- रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक १७ जुलै २०२६ रोजी सकाळी दहा वाजता अशोक मल्टीपर्पज सभागृह वाटद खंडाळा येथे “शेतकरी संवाद भव्य मेळावा “आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी मुंबई उच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध असलेले वकील ॲड. रोशन पाटील तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपकृषी अधिकारी प्रदीप भुवड, मंडळ कृषी अधिकारी सौ. वर्षा नवलकर, मंडळ कृषी अधिकारी श्री. विकास मेढे तसेच खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे उपक्रमशील व सेवाभावी अध्यक्ष प्रथमेशजी गावणकर उपस्थित रहाणार आहेत.
या शेतकरी संवाद मेळाव्यास खंडाळा, सैतवडे, जांभारी, कासारी चाफेरी, जयगड वरवडे परीसरातील शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे. शेतकरी वर्गाला ही एक सुवर्णसंधी प्राप्त करून दिल्याबद्दल खंडाळा पंचक्रोशीतील नागरिकांनी आयोजक सेवाभावी कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांचे कौतुक केले आहे.



