रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे उभ्या डंपरला क्रेटाची भीषण धडक; ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

लांजा दि. १४ जुलै :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. लांजा शहरातील शांतिनगर येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान क्रेटा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोन महिला आणि दोन पुरुष अशा एकूण ४ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर कारचालक गंभीर जखमी झाला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की, धडक बसताच क्रेटा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या एका बाजूला एक डंपर (क्रमांक MH 05 EL 3877) उभा होता. गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली क्रेटा कार (क्रमांक MH 01 CP 8021) आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शांतिनगर परिसरात आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट उभ्या डंपरच्या पाठीमागच्या भागावर जाऊन जोरात आदळली.

या अपघातात चारजण जागीच ठार झाले असून,  कार चालकाची प्रकृती  चिंताजनक आहे. जखमी चालकाला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

स्थानिकांची धाव आणि बचावकार्य

अपघाताचा आवाज एवढा भयानक होता की, परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने कारचे दरवाजे तोडून मृतदेह आणि जखमी चालकाला बाहेर काढले. जखमी चालकाला तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button