रत्नागिरी

वाटद खंडाळा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन बंद घरे फोडली

गणपतीपुळे दि. १३ जुलै (वैभव पवार) :- खंडाळा परिसरात चोरट्यांनी डोके वर काढत एकाच रात्री तीन बंद घरांना लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाटद खंडाळा येथील रहिवासी राकेश शशिकांत पवार (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ जुलै रोजी रात्री १० ते १३ जुलै रोजी सकाळी ६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाज्यावरील कुलूप धारदार हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर गोदरेज कपाटातील सुमारे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे, किंमत सुमारे १३ हजार रुपये, चोरून नेले.

चोरीची माहिती मिळाल्यानंतर परिसरात चौकशी करताना फिर्यादींना आणखी धक्कादायक माहिती समोर आली. आदर्श नगर येथील शुभम श्रीकांत महाडीक यांचे मुंबईला गेल्याने बंद असलेले घर, तसेच श्रीराम नगर येथील मंदार श्रीकांत बारगुडे यांच्या बिअर शॉपीचे गोडाऊन आणि परेश चंद्रकांत गुरव यांचे बंद घरही चोरट्यांनी फोडल्याचे उघड झाले. त्यामुळे एकाच परिसरात सलग तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त होत आहे.

या घटनांची नोंद जयगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा व जयगड पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button