रत्नागिरी

रायपाटण ग्रामस्थांनी सहाय्यक पोलिस फौजदार दत्ताराम बाणे यांचे केले स्वागत

रायपाटण दि. १० (स्नेहल नलावडे ) :-  सहाय्यक पोलिस फौजदार श्री. दत्ताराम बाणे यांनी रायपाटण पोलीस दुरक्षेत्रचा पदभार स्वीकारल्यानंतर समस्त रायपाटण ग्रामस्थांच्यावतीने शाल श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

रायपाटण पोलीस स्टेशनला रुजू होण्यापूर्वी श्री. दत्ताराम बाणे यांनी रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण, तसेच मंडणगड व देवरुख पोलीस स्टेशनला मिळून सुमारे ३२ वर्षे इतकी प्रदीर्घ सेवा केली असून, या अनुभवाचा फायदा रायपाटण दशक्रोशीतील जनतेला मिळेल, असा विश्वास पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

या स्वागत प्रसगी पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, पत्रकार शरद देसाई, पोलीस पाटील महादेव नेवरेकर, मंगेश पराडकर मनोज गांगण, सुदेश कोलते, प्रकाश पाताडे, संतोष कारेकर, प्रसाद देसाई, गोपीनाथ देसाई, बंटी गुरव, जितेंद्र गांगण, कुणाल गांगण, अण्णा चापले आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button