रत्नागिरी

मंडणगड तालुक्यातील बाणकोट किल्ला उर्दू शाळेचा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान

रत्नागिरी दि. १४ जुलै :- जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा बाणकोट किल्ला उर्दू शाळेला सन २०२४-२५ चा जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते सन्मान पुरस्कार देण्यात आला.

ही शाळा रत्नागिरी जिल्ह्यातील एक आदर्श शाळा आहे. शाळेच्या प्रगतीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.मुझफ्फर मापकर, सिकंदर मापकर, इंतीखाब अनवारे, डॉ.नौशाद अनवारे व सर्व पालक आणि सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक पठाण शाखालीदखान यांचे मोठे योगदान आहे.

त्याचप्रमाणे माजी केंद्र प्रमुख श्री बशीर परकार सर,आजी केंद प्रमुख श्री अहमद नाडकर सर , शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजेंद्र रेवाळे सर , शिक्षण विस्तार अधिकारी(उर्दू) श्री नझीर वलेले सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्याणी मुळे मॅडम यांची प्रेरणा लाभली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button