रत्नागिरी

देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रामध्ये उभारलं जातंय अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालय

संगमेश्वर दि. ९ ( प्रतिनिधी ):- देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रामध्ये लवकरच अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या संग्रहालयाचे स्वतंत्र दालन उभारण्यात येत आहे अशी माहिती विज्ञान केंद्राचे संस्थापक आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.

या संग्रहालयामध्ये जागतिक आणि भारतीय अवकाश विज्ञान तंत्रज्ञानाचा इतिहास २५ एक्झिबीट्सद्वारे मांडण्यात येणार आहे तसेच अवकाश विज्ञानाबाबत अनेक प्रकारची अद्ययावत माहिती असलेली पॅनेल्स बसविण्यात येणार आहेत. सर्व एक्सीबिट्स प्रमाणबद्ध असून त्यामध्ये विक्रम लँडर, मंगलयान, क्रायोजनिक इंजिन, गगनयान शटल, आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र, अपोलो ११ , क्युरिऑसिटी मार्स रोव्हर अशा विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण करणाऱ्या एक्झिबीट्सचा समावेश आहे. या संग्रहालयातील एक्झिबीट्ससाठी सुमारे ३० ते ३२ लाख रुपये खर्च येणार असून अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान दालनामुळे कोकणातल्या हजारो बुद्धिमान विद्यार्थ्यांना बौद्धिक विकासाची चालना मिळेल असा विश्वास श्री भागवत यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button