रत्नागिरी

रत्नागिरी येथील आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरात वक्तृत्व स्पर्धा

रत्नागिरी दि. ४ ऑगस्ट : श्रीमती आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरातील ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कदम व बालकमंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा काळे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

शुभंकर ओक याने लोकमान्य टिळकांच्या पेहरावात भाषण केले. स्पर्धेचे परीक्षण फाटक हायस्कूलच्या शिक्षिका सौ. प्रज्ञा दामले यांनी केले. विजेत्यांची नावे अशी- लहान वयोगट- अ- हर्ष जोशी, शौर्य पाध्ये, शर्विन कुंभार, ब गट- शर्वी साळवी, मीरा घाणेकर, साई सनगरे. मोठा वयोगट- अ गट- गौरी घैसास, श्राव्या डोंगरे, श्रावी विचारे, ब गट- मुद्रा भावे, शुभंकर ओक, मुक्ता मालशे, क गट- वर्णिका कांबळे, ग्रंथा कांबळे आणि आरोही कांबळे. प्रमुख पाहुणे कदम यांनी विद्यार्थ्यांना टिळकांच्या जीवनातील काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लोकमान्यांच्या जीवनावरील गीत सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिका, सेविकांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button