
देवरुख दि. ९ :- तालुक्यातील ताम्हाणे – नांदळज – कोळंबे रस्त्यावरील नांदळज गावाजवळ रानरेड्यांचा (गवे) वावर वाढला असून, मंगळवारी त्यांनी थेट भरवस्तीत असलेल्या भातशेतीत घुसून पिकांचे प्रचंड नुकसान केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदळज येथील मुख्य रस्त्यालगत आणि लोकवस्तीच्या अगदी जवळ असलेल्या भातशेतीमध्ये मंगळवारी रानगव्यांचा कळप दिसून आला. या गव्यांनी शेतात धुमाकूळ घालत आहेत. एरवी जंगलात किंवा डोंगराळ भागात आढळणारे हे पशू आता थेट मानवी वस्तीत आणि रस्त्यालगतच्या शेतांमध्ये येऊ लागल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे
गव्यांना मानवी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी वनविभागाने या भागात गस्त वाढवावी आणि ठोस उपाययोजना करावी.



