रत्नागिरी

केळ्ये येथील गोडबोले विद्यामंदिरात अमली पदार्थ विरोधी दिन

रत्नागिरी दि. ७ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या केळ्ये येथील श्री. शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माजी विद्यार्थी व प्रमुख अतिथी सध्या पोलीस दलात कार्यरत सुरज भोळे यांनी दीपप्रज्वलनाने उद्घाटन केले.

याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील यांनी सुरज भोळे यांचे स्वागत केले. श्री. भोळे यांनी या शाळेतील अनुभव सांगितले व त्यानंतर अमली पदार्थ कोणकोणते आहेत, ते कसे ओळखायचे, ते आपल्या आयुष्यामध्ये कसे घातक आहेत, त्याचे आपल्या शरीरावर व आयुष्यावर कसे दुष्परिणाम होतात, आपले कुटुंब कसे उद्वस्त होऊ शकते, याची सविस्तर माहिती दिली. हे पदार्थ बाळगलेले पकडले गेल्यास कोणकोणत्या शिक्षा होऊ शकतात याची सुद्धा माहिती विद्यार्थ्याना देऊन तरुण मुलांनी या पासून अलिप्त राहिले पाहिजे, असे आवाहन केले. शिक्षिका सौ. अनघा रसाळ यांनी छत्रपती शाहू महाराजांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रावणी केळकर हिने केले. रुद्र सनगरे याने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button