रत्नागिरी

रत्‍नागिरी नगर राजभाषा कार्यान्‍वयन समितीची अर्धवार्षिक बैठक मोठया उत्‍साहात संपन्‍न

रत्‍नागिरी दि. २५ :- रत्‍नागिरी स्थित रत्‍नागिरी नगर राजभाषा कार्यान्‍वयन समितीची या वर्षीची पहि‍ली अर्धवार्षिक बैठक मोठया उत्‍साहात संपन्‍न झाली.  समिति केंद्र सरकार चे कार्यालय, बैंक, वीमा व केंद्र सरकारच्‍या अंतर्गत असणारे 30 कार्यालयांमध्‍ये हिंदी भाषेचा कार्यालयीन कामकाजात वापर व प्रसार करण्‍याचे दृष्टीने भारत सरकार, गृह मंत्रालय राजभाषा विभाग द्वारा गठित केलेली आहे. समितीचे अध्‍यक्षपद तथा संचालन बँक ऑफ इंडियाच्‍या विभागीय कार्यालयांस सोपवलेले आहे.

अध्‍यक्षीय भाषणात बोलताना समि‍तिचे अध्‍यक्ष श्री श्री नरेंद्र रघुनाथ देवरे म्‍हणाले की आपली समिति भारत सरकार कडून हिंदीच्‍या प्रचार प्रसार करिता दिला जाणारा सर्वोच्‍च पुरस्‍कार ‘नराकास राजभाषा सम्‍मान पुरस्‍कार’  देवून गौरव केलेली समिति आहे. सर्व सदस्‍य कार्यालयांनी राजभाषा हिंदी मध्‍ये चांगले योगदान दिले आहे. सर्व सदस्‍य कार्यालयांचे आभार मानून त्‍यांनी आवाहन केले की कार्यालयीन कामकाजामध्‍ये हिंदी चा वापर करून केंद्र सरकारचा उद्देश्‍य सफल करावा. सोबतच येथील जनतेची भाषा मराठी आहे तिचा ही सम्‍मान ठेवून मराठी मध्‍ये ही कामकाज करावे.

समितीच्‍या प्रगतीचा वार्षिक आढावा समितीचे सदस्‍य सचिव श्री रमेश गायकवाड यांनी घेतला. समितीने सध्‍या सामाजिक जबाबदारी म्‍हणून वृक्षारोपणाचे कार्य हाती घेतले  आहे व वृक्ष म‍ित्र मंचची स्‍थापना केली याच बरोबर समिति ने डोळे तपासणी शि‍बिर, रक्‍तदान शिबिर, स्‍वच्‍छता अभियना आयोजन गतवर्षी प्रमाणे यावर्षी ही आयोजि‍त करण्‍याचा बैठकीत निर्णय घेण्‍यात आला.

समि‍ती च्‍या राष्‍ट्रीय कार्य अंतर्गत हर घर तिरंगा बाईक रैली दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही काढण्‍याचे निर्णय घेण्‍यात आला.

‘राजभाषा रत्‍नसिंधु’ नामक हिंदी पत्रिका प्रसिध्‍द केली जाते तसेच ई पत्रिका ‘प्रेरणा’ चे प्रकाशन करण्‍यात आले. प्रमुख अतिथि म्‍हणून सहायक निदेशक श्री प्रमोद सांगोले, गृह मंत्रालय, राजभाषा विभाग यांनी समितीच्‍या कार्याची समीक्षा केली व त्‍यांनी समितीच्‍या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. समिती ने दरवर्षी प्रमाणे विश्‍व हिंदी दिवस साजरा करून त्‍याच दिवशी पहिले हिंदी कवी सम्‍मेलनाचे आयोजन केले.  समिती द्वारे कार्यालयीन कामकाजात हिंदीचा वापर करण्‍याकरिता कार्यशाला तथा  विविध सेमीनार चे आयोजन केले.

समि‍ती द्वारा 10 वी, 12 वी प्राविण्‍य प्राप्‍त यशस्‍वी गुणवान मुलांचे समिति द्वारा सन्‍मान चिह्न देवून गौरव करण्‍यात आला. राजभाषा हिंदी मध्‍ये उत्‍कृष्‍ठ कार्य करण्‍यारे कार्यालयांना शील्‍ड व प्रमाणपत्र देवून गौरविण्‍यात आले. एनपीसीएल चे उप प्रबंधक (कार्मिक) श्री प्रशिक गजभिये यांनी डीआईजी कुणाल नाईक, भारतीय तटरक्षक वायु अवस्‍थान  यांनी समितीच्‍या प्रगती विषयी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. सभा यशस्‍वी होण्‍यासाठी न्‍यूक्लियर कार्पोरेशन चे सर्व अधिकारी व टीम, कोर कमेटी सदस्‍य तसेच बँक ऑफ इंडियाचे आईटी अधिकारी श्री शुभम सोनार यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन श्री संतोष पाटोळे, कोंकण रेलवे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री ललित प्रकाश, दीप स्‍तंभ कार्यालय यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button