
रत्नागिरी, दि. २३ :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने सन २०२४ वर्षाकरिता प्रदान करण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत.
यामध्ये सन २०२४ करिता जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, ठाणे विभागात पावस येथील आनंद जयंत देसाई यांना जाहीर झाला आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कार्थींची निवड करण्यात आली आहे. कक्षाधिकारी रुचिता पिंपळे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आले आहेत. आनंद जयंत देसाई यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



