रत्नागिरी
उमेश कुळकर्णी यांचेकडून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वागत

रत्नागिरी दि. १७ :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कोकणचे नेते माजी बांधकाम मंत्री आमदार श्री. रवींद्र चव्हाण हे आज बुधवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी श्री. चव्हाण यांचे स्वागत केले.
यावेळी राज्य फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटवर्धन, माजी आमदार विनय नातू यांच्यासह उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, भाजपाचे माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते.



