
रत्नागिरी दि. १६ :- स्वयंभु श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान, मालगुंड, रत्नागिरीतर्फे जिल्हा परिषदेच्या १३ शाळांतील १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
सोमवार दि. १५ जून पासून शाळा सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याची भूमिका स्वयंभु श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान, मालगुंड, रत्नागिरीतर्फे घेण्यात आली होती.
त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या १३ शाळेतील विद्यार्थ्यांना सहा वह्या, स्कूल बॅग, छत्री, वॉटर बॅग, पेन्सिल बॉक्स, फ्रुटी व चॉकलेट आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी कुणी आर्थिक मदत केली, कुणी नियोजन केले, कुणी वाहतुकीची जबाबदारी सांभाळली, तर कुणी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. प्रत्येकाचे योगदान हे महत्त्वाचे आणि प्रेरणादायी आहे. आपल्या सहकार्यामुळेच हा उपक्रम एका सेवायज्ञाचे रूप धारण करू शकला.
आपल्या निःस्वार्थ योगदानामुळे श्री दुबळेश्वर महादेवांच्या चरणी सेवा अर्पण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. समाजहितासाठी एकत्र येणारी अशी माणसे हेच खरे समाजाचे वैभव असून, आपल्यासारख्या सहकाऱ्यांमुळेच सेवाकार्याची ज्योत अधिक तेजस्वी होत राहते. या सर्वांच्या सहकार्याबद्दल स्वयंभु श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान तर्फे आभार मानण्यात आले आहे.


