रत्नागिरी

रत्नागिरीत स्मार्ट मीटरवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

रत्नागिरी दि. १६ :- काल MSEDCL ठाणे शाखेकडून कोकणातील लाखो वीज ग्राहकांना “48 तासात स्मार्ट मीटर बसवू” असा  SMS गेला. त्यामुळे संपूर्ण कोकणात खळबळ उडाली. “आपण लोकशाहीत राहतो की हुकुमशाहीत?” असा सवाल सामान्य जनतेने उपस्थित केला.

शिवसेना UBT ने दिला सज्जड दम:

ग्राहकांच्या तक्रारीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी MSEDCL कार्यालयावर धडकले.

जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम म्हणाले:

“जनतेला जसा महावितरणने 48 तासात स्मार्ट मीटर बसवू असा दम दिला, तसाच दम आम्ही अधिकार्‍यांना देतो – तुम्ही 48 तासात एक तरी मीटर बसवून दाखवा! मग बघू.”

यावेळी उपस्थित पदाधिकारी:

तालुकाप्रमुख मयुरेश पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख किरण तोडणकर, शशी बारगोडे, महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोदड, महिला शहर संघटक सेजल बोराटे, नगरसेविका फौजिया मुजावर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

पार्श्वभूमी:

केंद्राचा नियम: 1 एप्रिल 2026 पासून प्रीपेड सक्ती रद्द. ग्राहकाच्या संमतीशिवाय प्रीपेड करता येणार नाही.

MSEDCL ची भूमिका: संचालक सचिन तळेवार यांनी स्पष्ट केलं – “नवीन स्मार्ट मीटर फक्त पोस्टपेड राहतील, प्रीपेड नाही”.

CM फडणवीसांचा आदेश: सामान्य ग्राहकांना प्रीपेड नको, घर बंद असताना जबरदस्तीने मीटर बदलू नका.

आता पुढे काय:

शिवसेना UBT च्या आक्रमक पवित्र्यानंतर MSEDCL बॅकफूटवर जाण्याची शक्यता. कोकणात सध्या स्मार्ट मीटरची सक्ती थांबू शकते.

ग्राहकांनी काय करावं:

48 तासाच्या मेसेजला घाबरू नका.

प्रीपेड नको असल्यास लेखी अर्ज द्या.

जबरदस्ती झाल्यास 1912 वर तक्रार करा किंवा स्थानिक नेत्यांशी संपर्क साधा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button