रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील विविध संवर्गातील १०२ जणांच्या प्रशासकीय बदल्या

रत्नागिरी दि. १६ :- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या अस्थापनेवरील, श्रेणी पोलीस उपनिरक्षक, सहायक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक तसेच पोलीस शिपाई या संवर्गातील सर्वसाधारण बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

या सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही करण्यासाठी जिल्हा स्तरावर आस्थापना मंडळ गठित करण्यात आले होते ज्याचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे हे होते तसेच सदस्य म्हणून अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी. बी. महामुनी व सदस्य सचिव म्हणून प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय), रत्नागिरी श्री. मुख्तार शेख यांनी काम पहिले.

या आस्थापना मंडळाचे अध्यक्ष व पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापना वरील, खालील नमूद सहायक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक तसेच पोलीस शिपाई या संवर्गातील सर्वसाधारण बदल्या ह्या त्यांच्या समक्ष पारदर्शक तसेच समुपदेशन द्वारे बदली करिता दिलेल्या पसंती क्रमांचा प्रशासकीय दृष्ट्या विचार करुन बदलीबाबत आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार त्वरित प्रभावाने बदली करण्यात आलेली आहे.

प्रशासकीय बदल्या

२३ सहायक पोलीस फौजदार, २० पोलीस हवालदा, पोलीस नाईक १, पोलीस शिपाई २१, प्रशासकीय बाब व समुपदेशन द्वारे १ वर्ष स्थगिती देण्यात आलेले पोलीस अंमलदार ३७ अशा एकूण १०२ जणांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.

चालक संवर्गातील बदल्या

पोलीस शिपाई 01, प्रशासकीय बाब व समुपदेशन द्वारे १ वर्ष स्थगिती देण्यात आलेले पोलीस अंमलदार १२ अशा एकूण १३ जणांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button