रत्नागिरी

राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून रत्नागिरीत प्रशिक्षण केंद्र सुरू करणार : नूतन अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा मनोदय

रत्नागिरी दि. १३ :- राज्य पतसंस्था फेडरेशनचे शिर्डी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. सहकार कायद्यामध्ये प्रशिक्षणाची आवश्यकता नमूद करण्यात आली आहे. कोकणात पतसंस्था चळवळ वाढवत असताना संचालक, कर्मचारी आणि सभासद यांच्यासाठी रत्नागिरीत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा आपला मनोदय आहे, असा विश्वास राज्य पतसंस्था फेडरेशनचे नूतन अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी येथे व्यक्त केला.

राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर रत्नागिरीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पतसंस्था चळवळीत अनेक दिग्गज मंडळी कार्यरत असताना कोकणातील पतसंस्था चळवळीत कार्यरत असणारे ॲड. दीपक पटवर्धन यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेली २० वर्षे संचालक म्हणून काम करत असताना आज पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा कोकणातील पतसंस्था चळवळ वाढीसाठी निश्चित केला जाईल असे ॲड. पटवर्धन म्हणाले.

आज ही संधी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातही कोकणचा आवाज हा दुमदुमत आहे. आपल्याला जी संधी मिळाली या संधीचा अधिक उचित उपयोग करून ही पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह, अधिक अद्यावत आणि अनेक कार्यक्षम करण्यासाठी जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी नक्की करीन, असे ॲड. दीपक पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, सहा कोटी सभासद या पतसंस्था चळवळीमध्ये संलग्न आहेत. १९,९०० पतसंस्था वेगवेगळ्या प्रकारच्या काम करताय आणि साधारणपणे ९ हजार पाचशे कोटींच्या ठेवी या संस्था चळवळीमध्ये आहेत. साधारणपणे १२०० कोटींचा भाग भांडवल या चळवळीमध्ये नव्याने निर्माण झालेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button