रत्नागिरीसामाजिक

पर्यावरण दिनी मत्स्यमचा अनोखा उपक्रम; खवय्ये – पर्यटकांना वितरित केले देशी झाडांचे सिडबॉल्स

रत्नागिरी दि. ७ : – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी च्या “मत्स्यम” ने अनोखा उपक्रम राबवला. मत्स्यमने पर्यावरण दिनी दिवसभर येणाऱ्या खवय्यांना सीड बॉल्स भेट दिले.

रत्नागिरीचे मत्स्यम गेल्या काही वर्षापासून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असते.यापूर्वी मत्स्यम ने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सिडबॉल्स वितरित केले होते. हीच परंपरा कायम ठेवत मत्स्यम ने यावर्षी दिवसभरात मत्स्यम ला भेट देणाऱ्या खवय्यांना सिडबॉल्स दिले. माती आणि शेणाच्या गोळ्यात वाळवलेल्या बिया या निमित्ताने वितरित झाल्या. वेगाने कमी होत असलेल्या आपल्या देशी झाडांच्या बियांचा यात समावेश होताच पण त्याच बरोबर काही औषधी झाडे, आंबा आणि फणस यांचाही यात समावेश होता.

मत्स्यम च्या या उपक्रमाचे सगळ्यांनीच भरभरून कौतुक केले आहे. व्यवसायाबरोबर मत्स्यम जपत असलेल्या सामाजिक भानाचे यावेळी कौतुक झाले.2019मध्ये मत्स्यमने सर्वप्रथम तत्कालीन वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमाकरीता देशी झाडांचे बीज आणि बॉल्स उपलब्ध करून देणाऱ्या सगळ्या मंडळींचे मत्स्यम सचिन देसाई, पल्लवी माने, आशिष वजरेकर यांनी विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button